Jump to content

अल्केमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अल्केमी (अरबी: "अल-किमिया" - देवाची किमया) - धातूंचे सोन्यात रूपांतर करण्याच्या तथाकथित प्रक्रियेला अल्केमी म्हणतात.

अल्केमी या संज्ञेचा संक्षिप्त इतिहास :

अल्केमी या संज्ञेचा चा जन्म प्राचीन इजिप्तमध्ये झाला होता, जिथे 'खेम' हा शब्द नील नदीच्या सभोवतालच्या पूर मैदानाच्या सुपीकता संदर्भात वापरला जात होता. इजिप्शियन लोकांचा मृत्यू नंतरच्या जीवनावरील असणारा विश्वास, आणि त्यांनी ममी तयार करण्यासाठी (mummification) विकसित केलेल्या प्रक्रियेमुळे रसायनांबद्दलचे प्राथमिक ज्ञान निर्माण झाले. अलेक्झांडर द ग्रेट याने इ. स. वि. पू. ३३२ मध्ये इजिप्त जिंकल्यानंतर, ग्रीकचे तत्वज्ञानी लोक इजिप्शियन पद्धतींमध्ये रस घेऊ लागले. त्यातूनच 'खेमिया' हा इजिप्तबद्दलचा ग्रीक शब्द तयार झाला. जेव्हा 7th व्या शतकात इजिप्तवर अरबांचा ताबा होता तेव्हा त्यांनी खेमिया या शब्दामध्ये 'अल-' जोडला आणि 'अल-खेमिया' म्हणजे 'ब्लॅक लँड', हा शब्द आता अल्केमी शब्दासाठी संभाव्य मूळ म्हणून पाहिला जातो. ग्रीक शब्द 'Khumos', ज्याचा अर्थ 'द्रव पदार्थ' आहे हे अल्केमी शब्दासाठी वैकल्पिक मूळ म्हणून सूचित केले गेले आहे. परंतु, अद्याप या बाबतीत एकमत झाले नाही.


[]

  1. ^ http://www.chm.bris.ac.uk/webprojects2002/crabb/history.html. Missing or empty |title= (सहाय्य)