Jump to content

सर्पदंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर्पदंश
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१० T63.0, T14.1, W59 (nonvenomous), X20 (venomous)
आय.सी.डी.- 989.5, E905.0, E906.2
मेडलाइनप्ल्स 000031
इ-मेडिसिन med/2143
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D012909

कुठल्याही सापाने चावा घेतल्यास त्याला सर्प दंश म्हणतात. सर्प दंशामुळे जखम वा विषबाधा होण्याची शक्यता असते. बहुतांशी सापाच्या जाती बिनविषारी असतात. ते भक्ष्य पकडण्याकरिता त्याला आवळून अथवा विष प्रयोगाने शिकार करतात. विषाचा वापर साप आत्मसंरक्षणाकरिता करत असतात.सापांच्या जास्त करून प्रजाती विषारी नसतात . antartica महाद्वीप सोडून सर्व महाद्वीपांवर विषारी साप आढळतात .जर आपण सापाला घाबरलो व हे त्याला कळले तरच तो आपल्याला घाबरून दंश करतो .

साप दिसला तर...

[संपादन]

जर आपल्याला कोठेही साप दिसला तर आपण त्या सापापासून लांब राहून लवकरात लवकर साप पकडणाऱ्या माणसाला बोलवावे अथवा गलोलीसारख्या काठीने त्या सापाच्या पाठीमागे जाउन त्या सापाचा फणा दाबून त्याला एका कापडी पीशवीत टाकून ती पिशवी दोरी किंवा वेलीने घट्ट बांधावी. साप जास्त करून आपल्या आजू - बाजूच्या परीसरात मिसळण्याचा प्रयत्न करतो , त्यामुळे साप कुठे आहे हे आपल्याला लवकर ल्क्ष्यात येत नाही . आपण जर घनदाट जंगलातून जात असू तर आपल्या सर्वांगाला झाकण्याचा प्रयत्न करा व डोक्यावर जाड कापडी टोपी घाला . आपल्या पावलांचा आवाज शक्यतो होऊ देऊ नका,व जर तुम्हाला कुठली जरी हालचाल दिसली तर लगेच घाबरून न जाता ती हालचाल कशाची आहे हे सावधगीरीने शोधा . असा अंदाज बांधा की ,साप इथेच कोठे तरी आहे व त्यानुसार तुमची हालचाल सावधपणे करा.

लक्षणे

[संपादन]

सापांचे भारतात अनेक प्रकार आहेत ,त्यातील खूपच कमी असे विषारी आहेत . भारतातले सर्प्दंशामुळे मरण।ऱ्या लोकसंखेत 75%हून अधिक विष।ने मरन्यापेक्षा साप चावल्याच्या भितीने मरतात . हे लक्ष्यात ठेवले पाहिजे क़ि ,प्रत्येक साप हा विषारी नसतो ,तसेच तो धोकादायक नसतो असेही नस्ते

प्रतिबंध

[संपादन]

हे लक्ष्यात ठेवा ,साप तेव्हाच दंश करतो जेव्हा त्याला धोका जाणवतो . जीवनात सापाशी सामना होणे म्हणजे अति धोक्याचा प्रसंग ओढवणे .साप दंश करतो कारण त्याल्या तुम्ही एक चांगली शिकार वाटता .जर सापाचा आपला जराजरी अभ्यास असेल तर आपल्याला समजेल की सापापासून वाचायच कसं. साप आपल्याला चावल्यावर न भीता त्याच्यावर प्रथमोपचार केले पाहिजेत , व जवळच्या दवाखान्यात लगेच गेलं पाहीजे .सापाची ओळख होणे महत्त्वाचे आहे म्हणजे किमान तो विषारी आहे का बिनविषारी हे ओळखता आले पाहिजे .

उपचार

[संपादन]

साप चावण्याची सामान्य लक्षणे आहेत, उल्टी होणे,चक्कर येणे,थंडी ,चिकट त्वचा,दूरदर्शन.आपण जेव्हा कुठल्याही जंगलात किंवा घनदाट झाडीत जातो,तेव्हा साप चावण्याची शक्यता जास्ती असते.साप चावल्यावर,ज्या जागी सपाने दंश केल्यावर त्या जागी काळे -निळे होते.जर आपण त्यावर लवकरात लवकर उपचार केले नाहीत तर ते विष राक्ताद्वारे पूर्ण शरीरात भिनते व त्यामुळे माणसाचा मृत्यूपण होऊ शकतो.जर आपल्याला असे आढळून आले की आसपास कोणालातरी साप चावला आहे तर आपण त्यावर काही प्राथमिक उपचार करू शकतो,जसे की,त्या माणसाला जेथे साप चावला आहे त्याच्या बाजूला पटकन कापडाचा तूकडा बांधावा जेणे करून ते विष शरीरात आजून कुठे भिनू नये व जमळ्यास त्या व्यक्तीला त्वरित दवाखान्यात घेउन जावे अथवा तोंडाने विष चोखून थुंकून द्यावे.जर ते विष काही प्रमाणात तोंडात राहिले तर त्यामुळे आपल्याला विषबाधा होऊ शकते व आपल्या तोंडातून फेस यायला लागतो त्यामुळे आपला मृत्यू पण होऊ शकतो.

संदर्भ

[संपादन]

सापाला जर कोणाच्या शरीराला चावायचे असले तर तो स्वतःचे दात एका सुई प्रमाणे वापरतो व जसे इंजेक्शन मधून त्यातील सोल्युशन आपल्या शरीरात जाते व आपल्याला एका रोगातून वाचवते तसेच साप जेव्हा चावतो ते फक्त आपल्या शरीराला हानिकारक असते.अखाददुसरे साप चावण्याऐवजी त्याच्या शत्रूच्या डोळ्यात स्वतःच्या जीभेद्वारे फेकतो व शत्रूला दिसेनासे होते मग तो साप त्याला चावतो व मारून टाकतो.फक्त अनाकोंडा सारखे साप माणसांना खाऊ शकतात पण कोब्रा,पायथॉन सारखे साप माणसांना खाऊ शकत नाहीत पण जर कोणी त्यांना त्रास दिला तर ते मारतात.साप चावणे हे जास्ती करून गावाकडील लोकांना होते.

साप ओळखणे

[संपादन]

सापांची ओळख होणे हे उपचारासाठी महत्त्वाचे असते ,पण त्या सापाची नेहमीच ओळख होईलच हे कधी -कधी संभव होत नाही.विषारी सापांमध्ये त्यांच्या विषावारून वाईपर ,kraits आणि कोब्रा हे तीन प्रकार ओळखता येतात .जर तुम्हाला या तिघांपैकी एक जरी साप चावला तरी घाबरण्याचे काहीही कारण नाही पण वैद्यकीय उपचार वेळेत घ्यावेत.