Jump to content

सूचौ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सूचौ
苏州
चीनमधील शहर


सूचौ is located in चीन
सूचौ
सूचौ
सूचौचे चीनमधील स्थान

गुणक: 31°17′59″N 120°38′07″E / 31.29972°N 120.63528°E / 31.29972; 120.63528

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत च्यांग्सू
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५१४
क्षेत्रफळ ८,४८८ चौ. किमी (३,२७७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५० फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,०७,२१,७००
  - घनता १,३०० /चौ. किमी (३,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://www.suzhou.gov.cn/


सूचौ (देवनागरी लेखनभेद : सुझोऊ) हे चीन देशातील पूर्वेच्या ज्यांग्सू प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर शांघायच्या १०० किमी पश्चिमेस यांगत्से नदीच्या काठावर वसले असून ते नांजिंग खालोखाल ज्यांग्सू प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१८ साली सूचौ शहराची लोकसंख्या सुमारे ४३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १ कोटी होती.

इ.स.पूर्व ५१४ मध्ये स्थापन केले गेलेले सूचौ हान राजवंशामधील १० प्रमुख शहरांपैकी एक होते. १०व्या शतकापासून सूचौ उत्तर व पूर्व चीनमधील व्यापार व वाणिज्याचे मोठे केंद्र राहिले आहे. गेल्या काही दशकांदरम्यान सुचौ जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असून ते चीनमधील एक प्रगत व सुबत्त शहर म्हणून ओळखले जाते. येथील कालवे, दगडी पूल, पॅगोडे व उद्यानांमुळे सुचौ चीनमधील एक मोठे पर्यटन केंद्र आहे तसेच येथील बागांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे. येथील सूचौ आय.एफ.एस. ही जगातील सर्वाधिक उंच इमारतींमध्ये‎‎ गणली जाते.

वाहतूक

[संपादन]

शांघायनांजिंग ह्या पूर्व चीनमधील दोन प्रमुख शहरांच्या मध्ये स्थित असल्यामुळे सूचौ शहर एक मोठे वाहतूककेंद्र बनले आहे. बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेमार्गावरील सूचौ हे एक वर्दळीचे स्थानक असून येथून चीनच्या अनेक शहरांसाठी द्रुतगती रेल्वे गाड्या सुटतात. शांघाय-नांजिंग एक्सप्रेसवे देखील सुचौमधूनच धावतो. शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच शांघाय हाँगकिओ आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शांघायमधील दोन्ही प्रमुख विमानतळ सूचौपासून जवळच स्थित आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

विकिव्हॉयेज वरील सूचौ पर्यटन गाईड (इंग्रजी)